अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.