राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे.