सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या आरोपांखील अटक करण्यात आली होती. सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याचप्रकरणाचा दाखला देत सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, ट्रम्प यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करावी, असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.