अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळला आहे. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी त्यांना मंत्रीपदाची ऑफरही देण्यात येतेय असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. मात्र लटकेंचा राजीनामा फेटाळण्यात आल्यामुळे ठाकरे गटाने आपला प्लॅन बी सुद्धा आखला असल्याचं सांगण्यात येतंय.