बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील जाधववाडी या गावात शिंदे यांच्या कुटुंबात पहिलं मुल जन्माला आलं ज्याचं नाव गणेश ठेवण्यात आलं. मात्र गणेशला आपण 'मुलगा' नसून 'मुलगी' असल्याची जाणीव झाली. पण समाज आणि नातेवाईकांचे बोलणे तसेच घरच्यांवर असलेली समजाची जबाबदारी यामुळे गणेशने आपले गाव सोडले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पहा 'गणेश शिंदे ते गौरी ताई शिंदे' होण्यामागचा हा साहसी प्रवास!