ठाण्यातील कळवा सूर्यनगर येथील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळाने मुख्यमंत्री आपल्या मंडळाच्या देवीच्या दर्शनासाठी आले नाही म्हणून देवीचे विसर्जन केले नाही. यावर मनसेकडून संताप व्यक्त केला गेला असून जर संध्याकाळपर्यंत देवीचे विसर्जन झाले नाही तर मनसे पदाधिकारी स्वतः तिथे जाऊन देवीचे विसर्जन करण्याचा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.