बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात मुंबई क्राईम ब्राँचचं 1 पथक नाशिक आणि कोल्हापूरसाठी रवाना. प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यासाठी क्राईम ब्राँच युनिट 8 चं 1 पथक रवाना. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र करून अधिक शिवसैनिक असल्याचा दावा केला जातोय, असा आरोप शिंदे गटानं केला होता. काल हे प्रकरण निर्मल नगर पोलिसांकडून गुन्हे शाखेला वर्गीकृत करण्यात आले होते .