शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली. विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंसारख्या तकलादू आणि स्वार्थी नेत्याच्या आरोपाला आम्हाला काडीचीही किंमत द्यायची नाही. लाचारी पत्करून राजकारणात काम करणारा माणूस म्हणजे नारायण राणे होय. तुम्ही लाचारी पत्करता.