नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरीता शेतकऱ्यांना महावितरणच्या वेबपोर्टलवर लिंकही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र या लिंकमधून क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या विधानसभा क्षेत्रातील सावनेर आणि कळमेश्वर हे दोन्ही महत्त्वाचे तालुके गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील हजारो शेतकऱ्यांवर सौर कृषिपंपापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत. सावनेर आणि कळमेश्वरमध्ये हजारो गोरगरीब शेतकरी आहेत. सौर कृषिपंप मिळाल्यास त्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा तर उपलब्ध होईलच, शिवाय भरमसाठ वीज बिलापासून मुक्तताही मिळणार आहे.

नागपूर : कोरोनामुक्तींतर रुग्णांना ह्दयपासून तर फुफ्फूस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकिय क्षेत्र सांगते. परंतु कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोविड सेंटर सुरू केले, तर सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेचा आरोग्य विभाग या सेंटरबाबत उदासीन असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात मेडिकल कॉलेजमध्ये सेंटर उभारले, मात्र सार्वजनिक आरोग्य विभागात अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

अमरावती : पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी प्रवीण ठाकरे यांनी बैलजोडीच्या साह्याने खत देण्याचे हे यंत्र तयार केले. बैलजोडीच्या साह्याने खत देणे यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या शेतात केले आणि ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या यंत्रामध्ये एका वेळेला 15 ते 30 किलो खत भरू शकतो. विशेष म्हणजे यासाठी या शेतकऱ्याने टाकाऊ साहित्याचाच वापर केला आहे. अतिशय कमी खर्चात आता शेतीला खत देता येणार असल्याने या यंत्राचा फायदा होणार आहे.

गडचिरोली : सिंचनाची कोणतीही सुविधा नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून आपले धानपीक जगवले. आता हे धानपीक कापणीला आलेले असताना परतीच्या पावसाने त्यांच्या हृदयात धडकी भरवली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आपले पीक साठवायल?
Recommended