नागपूरसह विदर्भातील सोमवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
- 3 years ago
नागपूर : पहाटे गाढ झोपेत असताना सदर येथील ४३ वर्षीय तरुणाचा जीर्ण इमारत पडल्याने मृत्यू झाला. घराच्या मलब्यात दबलेल्या चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. हे चौघे जखमी असून यात ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जीर्ण घरे असून नोटीस दिल्यानंतरही खाली केले जात नसल्याने अनेकांचे जीव धोक्यात आहेत.
नागपूर : राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने उद्योगांना स्वस्त वीज देण्याचे प्रयत्न शासनस्तरावरून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून औद्योगिक ग्राहकाकडून आकारले जाणारे वीज शुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या मंत्रिमंडळाने जून महिन्यातच मान्यता दिली होती. नव्या दरानुसार वीज शुल्क आकारणीसंदर्भात नुकतेच ऊर्जा विभागाने परिपत्रक निर्गमित केले असून ऑगस्ट महिन्यात पाठविण्यात येणाऱ्या बिलात ही सवलत दिसून येणार आहे.
गडचिरोली : कोरोना संसर्गामुळे सरकारची सगळी भिस्त ऑनलाइन शिक्षणावर आहे. पण, यात स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरी लोकांचाच विचार केल्याचे दिसून येत आहे. कारण, गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ८१. ५२ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याचे धक्कादायक वास्तव शिक्षण विभागाच्याच सर्वेक्षणातूनच पुढे आले आहे. असे असतानाही या भीषण वास्तवाला बगल देत ऑनलाइन शिक्षणाचे लंगडे घोडे पुढे दामटणे सुरूच आहे.
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे गाव संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेऊन गावातून दारू हद्दपार केली. मात्र, गावातील काही दारूविक्रेत्यांनी डोके वर काढत छुप्या मार्गाने दारूची विक्री सुरू केली आहे. महिलांनी पुन्हा कृती करीत गावातील दारूविक्रेता राकेश गोविंदकर याच्याकडून ४ हजार ५०० रुपये किमतीची ३० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended
नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal
Sakal
नागपूरसह विदर्भातील गुरुवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |