नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्य ठिकाणच्या कारकिर्दीप्रमाणे नागपुरातील कारकीर्दही वादळी ठरल्याने त्यांची बदली शहरातच नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, मुंढे यांची नागपुरातून बदली करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनपातील सत्ताधाऱ्यांत समझोता झाल्याची जोरदार चर्चा आहे. मुंढेंच्या बदलीसोबत सत्ताधाऱ्यांनी स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारासंबंधी न्यायालयात केलेल्या याचिकेचा संबंध जोडण्यात येत आहे.

नागपूर : राज्यात महाआघाडीचे सरकार असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ‘स्वयंसेवक' कसा काय नेमण्यात आला असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केला. एवढेच नव्हे तर त्यांनी राज्यपालांवर अधिकाराचा दुरुपयोग केला असल्याचा आरोपही केला. राज्य शासनाने कुलगुरु यांची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहे. त्यामुळे कुलगरुपदी नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचे मत घेण्याचेही सौजन्य राज्यपालांनी दाखवले नाही, असा आरोप मंत्रिमंडळाच्या बैठकीत राऊत यांनी केला.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनाबाधित मृताच्या प्लॅस्टिकच्या आवरणाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने अतिनील किरणावर आधारित एक उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे त्यातून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नागपूर : अनैतिक संबंधातून राहिलेल्या गर्भामुळे जन्मास आलेल्या बाळाची लपवणूक करण्यासाठी निष्ठूर मातेने जन्म होताच बाळाला नाल्यात फेकले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी बाळाला सोडून पलायन करणाऱ्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गडचिरोली : मुरखळा माल येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत गावात पुन्हा दारूविक्री करू देणार नाही, असा ठराव महिलांनी एकमताने संमत केल्यानंतर लगेच कृती करीत एका अवैध दारूविक्रेत्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चामोर्शी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून राकेश सुरेश गोविंदकर असे आ?
Recommended