नागपूरसह विदर्भातील बुधवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Latest Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : मोठा गाजावाजा करीत मनपाने उपराजधानीत जवळपास ३६०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यापैकी अर्धेअधिक कॅमेरे बंद, नादुरूस्त आहेत. तर शेकडो कॅमेरे झाडाझुडूपात लपलेले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या उद्देशाला तडा जात असून याकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांकडून होत असलेल्या मनमानी शुल्क वसुलीविरोधात राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. शाळांवर नियंत्रणासाठी ‘विशेष तपास पथक’ गठित करण्याची मागणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने केली आहे. टाळेबंदीमुळे पालकांसमोर आर्थिक संकट निर्मांण झाले असल्याने पालकांना शाळांचे शुल्क भरणे अशक्य आहे. त्यातच सध्या शाळाच बंद असून खासगी शाळांकडून सध्या ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. पालकांची आर्थिक स्थिती कोरोनामुळे बिघडल्याने ५० टक्के शुल्क घ्यावे व ऑनलाईन वर्ग बंद करावे अशी मागणी करण्यात आली.

विदर्भ : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देशात यावर्षी विक्रमी सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. देशात यावर्षी सुमारे 19 कोटी क्विंटल कापूस उत्पादकतेचा अंदाज असून महाराष्ट्रात अद्यापही पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत आहे. केंद्र सरकारने कापसाला या वर्षी 5550 रुपये क्विंटलचा दर जाहीर केला होता. बाजारात मात्र हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय तसेच महाराष्ट्रात कापूस पणन महासंघाला कापूस विकण्यावर भर दिला.

नागपूर : दीक्षितनगरमधील आशीर्वाद मेटल्स कंपनीतील चोरी प्रकरणात यशोधरानगर पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, एएसआय विनोद सोलव हेड कॉन्स्टेबल दीपक धानोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

चिमूर (चंद्रपूर) : वाघाच्या मिशा आणि रानडुकराचे दात विकण्यासाठी आलेल्या तिघांना वनविभागाने सापळा रचून अटक केली.
तिघांनी वाघाच्या दाताचा सौदाही केला होता. यातील दोन आरोपी दुचाकी वाहनाने जाताना आर्टिएम महाविद्या
Recommended