नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरून केले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मिसेस राऊत यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचप्रमाणे कामठी मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकरही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जूनला संपला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमअंतर्गत नवीन कुलगुरू पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी देशभरातून तब्बल १६० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला होता. यापैकी २५ पात्र उमेदवारांची राज्यपाल तथा कुलपती यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय शोध समितीने शिफारस केली आहे. यात नागपुरातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

नागपूर : महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांकरिता आणि शेतकऱ्यांच्या मदतीकरिता काढलेल्या जीआरचे वर्णन काळा जीआर असे करावे लागेल, तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, विदर्भावर अन्याय करणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विदर्भाकडे अजिबात लक्ष नाही, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. या जीआरची त्यांनी आज होळी केली.

टाकळघाट (जि. नागपूर) : बुटीबोरी औदयोगिक परिसरात कामगारांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेत त्यांच्यासाठी कामगार विम्याचा दवाखाना (ईएसआयसी) बनवण्यात येईल असे येथील लोकप्रतिनिधी वारंवार आश्वासन देऊन धीर देत होते. भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटूनही परिस्थिती मात्र जैसे थे असून रुग्णालयाचा मंजूर झालेला 175 करोड रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न बुटीबोरी येथील जय जवान,जय किसान या सामाजिक संघटनेने आयोजित पत्रक?
Recommended