नागपूरसह विदर्भातील बुधवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : इंडियन ऑईल कंपनी राज्यात एक हजार कोटींची नवीन गुंतवणूक करणार असून नागपुरात २०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे येथील एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाची क्षमता १६ टक्क्यांनी वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा राज्य कार्यालयाचे कार्यकारी संचालक व राज्य प्रमुख अमिताभ अखौरी यांनी वेबिनारच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना दिली.

नागपूर : केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यात आला असून, क्रीडा विषय अनिवार्य करण्यात आल्यामुळे शालेय स्तरावर 'स्पोर्ट्स कल्चर' तयार होईल, अशी आशा शहरातील क्रीडा संघटक व शारीरिक शिक्षकांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच वर्तमान शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 'स्पोर्ट्स फॉर ऑल' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

नागपूर : १५ वर्षीय ग्रँडमास्टर रौनक साधवानी बुधवारपासून सुरू होत असलेल्या कटारा ऑनलाइन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार आहे. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान पटकावणाऱ्या रौनकची सलामी लढत द्वितीय मानांकित अमेरिकेचा ग्रँडमास्टर डॅनियल नारोदितसकीविरुद्ध होणार आहे. नारोदितसकीने पात्रता फेरीत १४६ गुणांसह अव्वल स्थान पटकाविल्याने त्याला नमविण्याचे फार मोठे आव्हान रौनकपुढे राहणार आहे.

भंडारा : राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने स्वतः पुढाकार घेत व्यायामशाळा (जीम) सुरू करावे, अशी सूचना केल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले आहे. अनलॉकबाबत केंद्र सरकार ॲडवायझरी काढत असून त्यांच्या ऍडवायझरीचे पालन राज्य सरकार करीत असते. मात्र जीम व इतर व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढते आहे. त्यामुळे या सर्वांचा सारासार विचार करता स्वतःच्या ॲडवायझरी काढून जीम व इतर व्यवसाय सुरू करून व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशा सूचना सरकारला दिल्याचेही विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले आहे.

यवतमाळ : नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वा?
Recommended