नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal
  • 3 years ago
नागपूर : महानगरपालिका आयुक्त तकाराम मुंढे सकाळी सहा वाजताच मनपा मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष 24 तास सुरू असतो. येथे रात्र पाळीत असलेले चार कर्मचारी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या कर्मचा-यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सरकारी-निमसरकारी कंत्राटदारांचे 1500 कोटीचे देयके सरकारकडे थकले आहे. त्यामुळे कंत्राटदारासह यावर अवलंबून असलेल्या मजुर, बांधकाम साहित्याचा पुरवठा करणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना बॅंकांच्या कर्जाच्या परतफेडीची चिंता आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नियमित कुलगुरू मिळावा यासाठी 30 आणि 31 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात जवळपास 30 पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे मुलाखतीची सूचना देण्यात आलेली आहे.

चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ येथील 75 वर्षीय कोरोना रुग्ण महिलेचा चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून पठाणपुरा बाहेरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खांदा देत मुखाग्नी दिली.

चंद्रपूर : ताडोबाचे प्रवेशद्वार असलेल्या पद्मापूर येथील तपासणी नाक्‍यावर तपासणीदरम्यान दुचाकीस्वाराकडे वाघाच्या मिशा आढळून आल्या. ही गंभीर घटना लक्षात येताच दुचाकीवरील दोन जणांना वनविभागाने ताब्यात घेतले.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended