नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : लोकप्रतिनिधींनी लॉकडाउनला विरोध केला आहे. प्रशासनाने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतल्यास जनतेसह रस्त्यावर उतरणार, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी आज दिला. महापालिकेत बैठक नियोजित असताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही त्याचवेळी बैठक बोलावून राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागपूर : कामठी तालुक्‍यात कोरोनाबाधीत रुग्णांनी पाचशेचा आकडा पार केला असून मागील बारा दिवसांपासून सतत एकामागे एक पंधरा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी कायम आहे. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा तब्बल 36 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

नागपूर : दहावीच्या निकालात यंदा सीबीएसई विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यंदा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून विभागाचा निकालही 93.84 टक्‍क्‍यावर म्हणजे 26.57 टक्के वाढल्याने याचा फायदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी दोन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी कस लागणार आहे.

अमरावती : बडनेरा येथील रुग्णालयात लॅब टेक्‍निशियनने एका युवतीची आक्षेपार्ह तपासणी केल्याने हा मुद्दा आता जिल्ह्यात चांगलाच तापला आहे. विविध क्षेत्रांतील मंडळींकडून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या रुग्णालयाची काल तोडफोड करून नागरिकांनी आपला संताप व्यक्‍त केला.

भंडारा : कोरोना विषाणूंचा संसर्ग सिहोरा परिसरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात शनिवार आठवडी बाजाराच्या दिवशी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रविवारीही कर्फ्यू ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended