नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरु असून, त्यासाठी शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. जिल्ह्यातील पाच शिक्षक व शिक्षिकांना 5 सप्टेंबरला शिक्षकदिनाचे औचित्य साधून युनेस्को स्कूल क्लब्स ऑफ महाराष्ट्रच्या वतीने ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.

नागपूर : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत प्रलंबित कृषीपंप वीजजोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रस्ताव सादर केला आहे. कर्जस्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून मार्च 2018 पर्यंतच्या प्रलंबित वीजजोडण्या देण्यात येणार आहे.

नागपूर : रेल्वेच्या डब्यात कुजलेला मृतदेह आढळून आल्याने बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली. मृतदेहाची अवस्था लक्षात घेता तातडीने मोक्षधाम येथे दफनविधी करण्यात आला. पोलिस तपास सुरु आहे.

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला म्हणून अमरावतीच्या उपवनसंरक्षकाने पाच लाखांची लाच मागितली. त्यापैकी अडीच लाख रुपयांचा पहिला टप्पा स्वीकारताना त्याला अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

यवतमाळ : मागील तेरा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने जीवदान मिळत असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या आदेशात प्रशासक नियुक्तीचे निर्देश दिले होते. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येताच निवडणूक होण्याचे संकेत आहेत.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended