नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : महानगर पालिका माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील यंत्रणेवर चांगलाच वचक बसवला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळातही सफाई कर्मचारी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याने शहरातील साफसफाई होत होती, कचऱ्यांचे ढिग गायब झाले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची बदली होताच शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढिग दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेच्या मानाकंनात नागपूर शहराने आघाडी घेतली असताना स्थानिक लोक प्रतिनीधी आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मिळालेला हा मान पुन्हा धुळीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर : अनलॉकच्या प्रक्रियेंतर्गत टप्याटप्याने सर्वच सेवा पूर्ववत करण्यात येत आहेत. त्याच शृंखलेत २ ऑक्टोबरपासून नागपूरहून पुण्यासाठी एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दररोज दहा शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सुविधा सोईची आहे. या शिवशाही बसेसचे पुण्यासाठीचे भाडे प्रती व्यक्ती १३८० रुपये आकारण्यात येत आहे. औरंगाबादसाठी ९५० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

गोंदिया : महाविद्यालये बंद, इंटरनेट सुविधा नाहीत, मोबाईल फोन नाहीत अशा गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी 'झाडाखालची शाळा' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा आहे. नमाद महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख बबन मेश्राम यांनी रासेयोच्या दोन हजारांवर स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. गावोगावच्या झाडाखाली ही शाळा भरत आहे.

राजूरा (चंद्रपूर) : दहा लोकांचा बळी घेणाऱ्या आर टी वन वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सूरू आहेत. सतत हूलकावणी देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता सापळा रचला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यासाठी चक्क पिंजऱ्यामध्ये वनपाल, वनमजूरांना बसविण्यात आले आहे. दुसऱ्या पिंजऱ्याची दोरी वनमजूरांचा हातात असणार आहे. वाघ पिंजऱ्याच्या आत शिरताच ही दोरी ओढली जाणार आहे. दोरी ओढताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होणार असून वाघ पिंजऱ्यात अडकणार आहे.

नागपूर : बोरखेडी ते बुटीबोरी सेक्शन दरम्य
Recommended