नागपूरसह विदर्भातील मंगळवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Marathi News I Marathi News | ठळक बातम्या
  • 3 years ago
नागपूर : हनी ट्रॅप ऑडिओ क्‍लिपची चौकशी पोलिस सहआयुक्तांमार्फत केली जात आहे. यावर समाधान व्यक्त करून या घटनेचे गांभीर्य ओळखल्याबद्दल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी फडणवीस आणि गृहमंत्र्यांमध्ये या प्रकरणावरून चांगलाच वाद रंगला होता.

नागपूर : बारावीत 92 टक्‍के गुण घेत घवघवीत यश मिळवल्यामुळे दिवसभर आनंदात असलेल्या युवतीला स्टूलवर चढून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आरशासमोर सेल्फी घेत असताना तिचा पाय घसरला आणि स्टूलमध्ये अडकला. त्यामुळे ती डोक्‍याच्या भारावर पडली. डोक्‍याला गंभीर मार बसल्यामुळे युवतीचा मृत्यू झाला.

वर्धा : चिखली येथील धर्मा लोंडे यांच्या शेतात आरोपी असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस दिसताच शेतातील झोपडीत असलेल्या आरोपींनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी हा हल्ला परतून लावत चार जणांना अटक केली.

गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे रूपांतर महिला विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. चक्‍क विलगीकरण कक्षात जात युवकाने वृद्धेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अमरावती : समान काम समान वेतन, असे धोरण महापालिकेने अंगीकारले आहे. बाह्य संस्थांनी कंत्राट घेत महापालिकेतील आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व अग्निशमन दलात कामगार पुरविले आहेत. दरमहा त्यांचे वेतन महापालिका संस्थेला आरटीजीएसने अदा करते. मात्र कामगारांपर्यंत ते पोहोचत नाही. गेल्या फेब्रुवारीपासून अनेक जणांना वेतन मिळालेले नाही.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended