Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/6/2025
शिर्डी : आषाढी एकादशीनिमित्त साईबाबांना विठ्ठलस्वरूप मानणाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती साईबाबा मंदिरात म्हणली जाते. रविवारी आषाढी एकादशीनिमित्त साईभक्त एस. प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर आणि मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. साईबाबा हयातीत असताना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी विठ्ठलदर्शनासाठी जात असत. दासगणुंची एकदा आषाढी वारी चुकली. विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणूंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं. तेव्हा दासगणु महाराजांनी 'शिर्डी माझे पंढरपूर' अशी रचना केली. आजही साई मंदिरात बाबांच्या मंगलस्नानानंतर हीच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक बाबांचं विठ्ठलस्वरूप मानून दर आषाढीला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. विठ्ठलरूपी साईंचं दर्शन घेऊन धन्य होतात. आषाढी एकादशीनिमित्तानं संस्थानच्या वतीने साईबाबांच्या समाधीजवळ विठ्ठलाची प्रतिमा ठेवून तिचं पूजन करण्यात आलं आहे. 

Category

🗞
News
Transcript
00:00Music
00:04Music
00:08Music
00:16Music
00:20Music
00:24Music
00:28Music
00:32Music
00:40Music
00:42Music
00:48Music
00:54Music

Recommended