Pune News | बूम बॅरिअर थांबवणारBRT मधली घुसखोरी | Sakal Media

  • 2 years ago
Pune News | बूम बॅरिअर थांबवणारBRT मधली घुसखोरी | Sakal Media

बीआरटीमधील ही घुसखोरी आता थांबणार आहे
कारण पुण्यातील बीआरटीवर आता बूम बॅरिअर बसवण्यात येणार आहेत
तूर्तास प्रायोगिक तत्वावर डेक्कन कॉलेज चौकाजवळील बीआरटी मार्गात पहिला बूम बॅरिअर म्हणजेच (स्वयंचलित फाटक) बसवण्यात आलं आहे. हा बॅरिअर प्रायोगिक तत्वावर असून, लवकरच पुणे शहरातील उर्वरित ७ बीआरटी मार्गांवर विविध ठिकाणी हे बूम बॅरिअर बसविण्यात येणार आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून पुण्यात बीआरटी सेवा सुरु झाली
प्रवाशांचा वेळ वाचावा आणि इच्छित स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्याच्या हेतूनं BRT सुरु करण्यात आली होती पण बीआरटी मार्गावरील चित्र बदललं आणि या मार्गावर बस कमी आणि दुचाकी, चारचाकींचीच घुसखोरी सर्रास दिसू लागली. परिणामी, पुणे शहरातील अपघातांचं प्रमाणही वाढलं.आता अपघात कमी करण्याच्या हेतूनं पीएमपीएमएलनं बूम बॅरिअर बसवण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टर- अक्षय बडवे

Recommended