येरवडा तुरुंगात कारागृह पर्यटनाला सुरुवात | Sakal Exclusive | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
येरवडा (पुणे) : पुणे येथील ऐतिहासिक कारागृहात 26 जानेवारीला 71 व्या प्रजासत्ताक दिनी जेल पर्यटनला सुरुवात करण्यात आली.
राज्यातील काही कारागृहे ही विद्यार्थी, अभ्यासकांसाठी पर्यटन सुरू करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद, आमदार सुनिल टिंगरे, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपमहानिरीक्षक याेगेश देसाई उपस्थित होते. येरवडा स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता, २६ जानेवारीपासून राज्यात 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे.
Video - Sharayu Kakade
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended