पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात | Pune | MLC Election | Sakal Media
  • 3 years ago
पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान 1 डिसेंबरला राज्यात पार पडले. आज (ता.3) सकाळी मतमोजणीस सुरूवात झाली आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी 57.96 टक्के मतदान झाले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी ही पारंपारीक पद्धतीने होणार आहे. झालेले मतदान विचारात घेतले, तर मोजणीपूर्ण होण्यास किमान 36 तासांचा कालवधी लागणार आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्‍यक तो मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला तर कालवधी कमी होईल. प्राधान्यक्रमांच्या मतांवर मोजणी गेली, तर हा कालवधी आणखी वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended