मराठा आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात ओबीसी संघटन मोर्चा | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसींमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतायेत, मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करावा ही काही मराठा समाजातील नेत्यांची मागणी आहे,या मागणीच्या विरोधात ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा आक्रमक झालाय, राज्यात विविध ठिकाणी 24 जानेवारी आणि 18 फेब्रुवारीला विभागीत मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी जनमोर्चानं स्पष्ट केलंय, या आंदोलनात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार सहभागी होणारेत, आज पुण्यात ओबीसी घटकांची आज बैठक झाली या बैठकीत त्यांनी आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीये, राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ,मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको या मागणीसाठी हे आंदोलन करणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी दिलीये,राज्यात विविध ठिकाणी ओबीसी जनमोर्चाकडून आंदोलनाची हाक देण्यात आलीये, ....

बाईट - प्रा. लक्ष्मण हाके - ओबीसी जनमोर्चा,
बाईट - बाळासाहेब सानप - ओबीसी जनमोर्चा...
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended