चांदणी चौकाची चमक वाढणार; नितीन गडकरींनी टाकली कामावर नजर | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : मागील काही दिवसांपासून चांदणी चौकातील प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पालिकेने केल्यामुळे दोन मजली उड्डाणपुलाचे बांधकामाला वेग आला आहे. त्याची पाहणी आज शनिवारी सकाळी बारा वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
चांदणी चौक, कोथरूड, वारजे, बाणेरसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दोन मजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. चांदणी चौकातून मुंबई, सातारा, मुळशी आणि कोथरूडकडे जाता येईल, अशी या पुलांची रचना करण्यात आली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended