लाचार न होता स्वाभिमानाने जगणारा एक अवलिया..! | Flute Uncle | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
गोखलेनगर,ता.२: लाचार न होता वयाच्या ७२ व्या वर्षी देखील स्वाभिमानाने जगाणारे गंगाधर ईश्वर जाधव उर्फ (बासरीवाले बाबा) शिवाजीनगर, डेक्कन परिसरात वाहनांच्या गर्दीतून, माणसाच्या वर्दळीतून अचानक बासरीचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी मिळतो तो म्हणजे जाधव यांच्याकडून! लहानपणी गावाकडे यात्रेत मिळणाऱ्या बासरीचे आकर्षण जाधव यांना निर्माण झाले.बासरी शिकण्यासाठी कुठेही शिकवणी न लावता. जाधव २० वर्षांपासून सुंदर अशी बासरी वाजवत आहेत.हेमंत कुमार, किशोर कुमार, मोहम्मद रफी,लता मंगेशकर यासह जुन्या गाण्यावरती बासरीवादन करण्याचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे.ते पर्वती या ठिकाणी रहायला असून दररोज गरवारे पूल,जंगली महाराज रस्ता, संभाजी उद्यान, हॉटेल गुडलक, फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता या ठिकाणी पदपथावर बसून बासरी वादन करतात.दिवसभर पदपथावरून जाणारे - येणारे विद्यार्थी, नागरिक आपापल्या आवडीनुसार गाणी सांगतात त्याप्रमाणे जाधव बासरीवादन करतात.यामधून नागरिक सहखुशीने जाधव यांना दहा,वीस रुपये देतात या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह होते असं ते सांगतात.घरच्यांनी केलेल्या सहकार्यामुळे जाधव रस्त्यावर बसून देखील बासरीवादन करतात. 'रस्त्यावर बसून बासरी वाजवण्यासाठी लाज वाटत नाही' असं देखील ते म्हणाले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended