दोन तरुणांमधील भांडणातून चिंचवडमध्ये दहा वाहनांची जाळपोळ | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची दुचाकी जाळली. यामुळे सोसायटीतील इतर दहा वाहनेही जळाली. ही घटना चिंचवडमधील काकडे टाऊनशिप येथे बुधवारी (ता. 13) पहाटे घडली.पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अचानक आग लागल्यामुळे व मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रहिवंशामध्ये भितीचे वातावरण पसरले. काही नागरिकांनी अग्निशामकशी संपर्क केल्यावर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दहा गाड्या जळून खाक झाल्या होत्या.ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended