पुण्यात ‘एसी’ बसमधून फिरा फक्त दहा रुपयांत | Pune | PMPML | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे - शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी ठराव मंजूर केला. त्यासाठी आता ५० बसची खरेदी झाल्यावर मध्य भागात प्रवाशांना माफक दरात बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे. दहा रुपयांत दिवसभर प्रवास ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यात सुमारे ३० मार्गांचा समावेश असेल. त्यावर नव्या एसी मिडी बसची वाहतूक करण्यात येईल. या साठी विशिष्ट थांबे असतील. ही बससेवा शटल स्वरूपात असू शकेल. क्वार्टर गेट ते टिळक चौक (अलका टॉकीज) अशा स्वरूपाचा मार्ग असू शकेल. कष्टकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार यांना ही बससेवा उपयुक्त ठरू शकेल, असे पीएमपीच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
#PMPML
#CityBus
#ACBus
#Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended