आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार | Pune | Maharashtra | International Airport | Sakal |
  • 3 years ago
आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातच होईल. मात्र विमानतळाची नवीन जागा ही यापूर्वीच्या जागेजवळ असून, पूर्वीपेक्षा उपयुक्त आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे शिफारस प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुरंदर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी विमानतळाच्या जागेला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकी कोठे होणार याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
यासंदर्भात पवार म्हणाले, पुरंदर तालुक्यात यापूर्वी विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेच्या तुलनेत नवीन जागा ही उपयुक्त आहे. त्या ठिकाणी खाचखळगे कमी आहेत. बागायती क्षेत्र कमी आहे आणि विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी ही उपयुक्त आहे. त्यामुळे नवीन विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होईल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended