परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची शहरात गर्दी I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
नागपूर : संघ लोकसेवा आयोगामार्फत रविवारी नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमीचा परीक्षा पार पडली. शहरातील एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. कोरोना संकटातच परीक्षा होत असल्याने राज्यभरातून येणाऱ्या परीक्षार्थ्यांच्या सुविधेसाठी रेल्वे व एसटीतर्फे अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. पण, अपेक्षेच्या विपरित परीक्षार्थ्यांनी खासगी वाहनावर भर दिला. उमेदवारांमध्ये परीक्षेसंदर्भात कमालीची उत्सुकता दिसून आली. (व्हिडिओ : प्रतिक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended