शहरातील रस्ते उठले जीवावर! Live Marathi News | ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
नागपूर : ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आलेल्या उपराजधानीतील रस्त्यांची पावसामुळे चाळणी झाली असून, जागोजागी डांबरी रस्ते उखडून गिट्टी उघडी पडली आहे. गिट्टीवरून वाहने घसरून पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. केवळ शहरातील आणि शहराबाहेरच्याच रस्त्यांचीच दयनीय अवस्था झाली नाही. सिव्हिल लाइन्स, रामदासपेठ व धंतोलीसारख्या पॉश वस्त्यातही ठिकठिकाणी गिट्टी दिसून येत आहे. उन्हामुळे धुळींच्या कणाचाही त्रास वाढला आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देणार की मृत्यूंची वाट पाहणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended