आमदारांनी ठोकली धूम | Latest Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
मौदा (नागपूर) : तालुक्यातील गुरुदेव मोहल्ला येथे कामठी मतदार संघातील भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. नागपूर जिल्ह्यातील पेंच धरणाचं पाणी सोडल्यानं पेंच आणि कन्हान नदीनं धोक्याची पातळी गाठली. त्यामुळं नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरलं. आमदार सावरकर यांनी यातील काही गावांमध्ये जाऊन पाहणी दिली. मात्र, गावकऱ्यांनी आमदारांची गाडीच अडवून धरली. रात्रीपासून गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं असताना आमदारांचा दुपारपर्यंत पत्ताच नव्हता. दुपारी आमदार निघाले मात्र फक्त गाडीत बसूनच पाहणी करत असल्यानं नागरिकांनी त्यांची गाडीच अडवून धरली. पुराच्या पाण्यामुळं अनेकांची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळं त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांनी पुरामुळं बेघर झालेल्या नागरिकांची मदत करावी, अशी मागणी लावून धरली. नागरिकांचा रोष बघता पोलिसांना पाचारण करावं लागलं. अखेर पोलीसांच्या मदतीनं आमदारांनी धूम ठोकली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended