Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- मायक्रो फायनान्सचे महिलांचे कर्ज माफ झाले पाहिजे, या मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.

- कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.

- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देण्या-या गायी-म्हैशींकरीता 'गोकुळश्री' स्पर्धेचे बक्षीस वितरण.

- शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणा-या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसात 1 लाख 45 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

- जिल्ह्यात दिवसभरात 210 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 160 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.

- कोल्हापूर शहरात कोरोनापाठोपाठ आता सारी आजाराचाही धोका वाढत आहे. शहरात माझे कुटूंब,माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती पुढे आले आहे.

- मटका गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव, कॉन्स्टेबल रोहित पोवार या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बातमीदार - मतीन शेख
व्हिडिओ - मोहन मेस्त्री
Recommended