शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न; Raosaheb Danve यांचा आरोप

  • 2 years ago
राज्यसभेच्या साहव्या जागेचा निर्णय भाजपने केलेला नाही.आमच्या संसदीय बोर्डाची बैठक होईल त्यात हा विषय चर्चेला जाईल. संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. त्यामुळे संभाजीराजेंना ते उमेदवारी देणार आहेत की नाही आम्हाला माहित नाही. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधावे त्यांनतरच त्यांना उमेदवारी देऊ असं मी माध्यमात पाहिले. ते संभाजीराजे आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीत न उतरवता राष्ट्रपती कोठ्यातून सन्मानपूर्वक खासदारकी देण्यात यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती आणि आम्ही त्यांना त्यावेळी खासदारकी दिली असं दानवे म्हणाले. तर शिवबंधन बांधा असे सांगून संभाजीराजेंना अडकवण्याचा शिवसेनकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

#RaosahebDanve #SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #SharadPawar #SanjayRaut #BJP #UddhavThackeray #HWNews #Shivsena