आम्ही राणेंसारखे पळकुटे नाही, संजय राऊतांचा पलटवार

  • last year
भाजपाचे नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणे यांनी वरील विधान केले आहे. नारायण राणेंच्या याच इशाऱ्याला आता संजय राऊतांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मला बोलायला लावू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली, तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील. हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्र काढून बाहेर या. मग दाखवतो, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले आहे.

#SanjayRaut #NarayanRane #RautVSRane #BJP #Shivsena #ED #Money #Samna #UddhavThackeray