भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं. बावनकुळे यांचं हे विधान आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची लायकीच काढली आहे. उद्या भाजपवाले त्यांना पाच जागाही देतील. हीच शिंदे गटाची लायकी आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.