चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? - Nitesh Rane यांचा सवाल |
  • 2 years ago
सगळ्या नोटिसा ह्या फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटतात काय ? आमच घर बारा वर्षापासून तिथे आहे. आत्ताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? आताच सी आर झेड डिपार्टमेंटला जाग आली का ? जे उत्तर द्यायचं ते आम्ही 10 जूनला देऊ. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच कश्या येतात, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आमदार नितेश राणे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत खेरे हे काय सकाळी आमच्या घरी काय चहा घेऊन येतात का, त्यांना माहीत व्हायला की आमच्या घरी आम्ही कोणाला पैसे वाटतोय हे बघायला. ते माजी खासदार आहेत की बँकेचे मॅनेजर आहेत ? खैरे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, अशा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

#NiteshRane #ChandrakantKhaire #Rajyasabha #BMC #UddhavThackeray #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #Shivsena #HWNews
Recommended