Mansukh Hiren Case: सचिन वाझे कोण आहेत | Sachin Vaze | Mumbai | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव विधानसभेत गाजले. गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, आशिष शेलार, सुधीर मुनगंटिवार यांच्या तोंडी वाझेंचे नाव आले.सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 63 अधिक एन्काऊंटर केले. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. यामध्ये सचिन वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. या घटनेनंतर वाझे यांनी 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र, तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता.
#SachinVaze #MansukhHiren #MansukhHirenMurderCase #Mumbai #Maharashtra #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended