उत्तर प्रदेशमधील भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. योगींच्या दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांमुळे उत्तर प्रदेशसह दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे.