मराठा आरक्षणासाठी लाॅंग मार्च काढणार : छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मूक आंदोलन केले जाईल. आरक्षणाच्या संदर्भात समन्वयक व आम्ही खूप बोललो आहोत. आता जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. केवळ मते मागायला जसे ते येतात, त्याच पद्धतीने समाजासाठी काय करणार हे त्यांनी सांगणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुणे ते मंत्रालय असा लाॅंग मार्च काढून समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला...