सोलापुरात पार पडलं धनगर समाजाचं 'ढोल बजाओ आंदोलन

  • 3 years ago
धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये स्थान मिळावं या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन होत आहेत. त्याच प्राश्वभूमीवर आज सोलापूर मधील चार हुतात्मा चौक येथे धनगर समाजाच्या वतीने 'ढोल बजाओ आंदोलन' करण्यात आलं. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,चार हुतात्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भंडारा उधळून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान ढोल बडवून धनगर समाज केंद्र आणि राज्य सरकारला जाग करणारं आहे,
येत्या काळात धनगर समाजाला न्याय नाही मिळाला तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा धनगर आंदोलकांनी दिला आहे. यावेळी 'ढोल बजाओ सरकार जलावो' अशी घोषणा ही आंदोलकांकडून देण्यात आली. (व्हिडिओ - विश्वभूषण लिमये)

Recommended