बुलढाणा : मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात रविवारी (27 एप्रिल) पहाटे अडीचच्या सुमारास भीषण आग लागली होती. "सब गोलमाल है सब गोलमाल है सिद्धे रस्ते की ये टेडी चाल है ईडीने आपले स्वतः चेच कार्यालय जाळून घेतले", अशा कडक शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ईडीने स्वतः चेच कार्यालय जाळून घेतले : दहा वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी, विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी ईडीच्या कार्यालयाचा उपयोग झाला आहे. आता त्यांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालयच जाळून टाकले. अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.