वसई विरार महापालिकेच्या ८५० पेक्षा जास्त आरक्षित जागा असून, त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. वसई-विरार शहर महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे नायगाव कोळीवाड्यात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर पाच मजली बेकायदेशीर इमारत उभी करण्यात आली आहे. संबंधीत अधिकारी आणि भूखंडमाफियांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे राकेश कदम यांनी पारनाका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे.