राहुल गांधी यांची खासरदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर बरसले. "राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं", असं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.