Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/24/2023
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. मात्र सुरत न्यायालयाने त्यांना गुरुवार, 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#PrithvirajChavan #RahulGandhi #Congress #SoniaGandhi #Maharashtra #Budget2023 #BJP #Loksabha #PMModi #HWNews

Category

🗞
News

Recommended