महाराष्ट्रातला वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे अशी पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हादरले आहे. अशी खोचक टीका राऊत यांनी केली.