कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे काल नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा ताफा न थांबल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर कापूस व खोके फेकून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.