हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा! | Hasan Mushrif | Sharad Pawar | ED Raid | High Court

  • last year
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. तसेच, सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. मात्र गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास हायकोर्टाकडून तहकूब करण्यात आली आहे.

#HasanMushrif #BombayHighCourt #ED #VarunSardesai #SheetalMhatre #PrakashSurve #ViralVideo #SanjayRaut #PrasadLad #NiteshRane #SupremeCourt #Shivsena #BJP #Maharashtra

Recommended