6 months ago

Hasan Mushrif यांच्या घरावर ED ची धाड, मुश्रीफ समर्थक आक्रमक; सरकारविरोधात घोषणाबाजी | NCP |

HW News Marathi
HW News Marathi
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. आज सकाळी कागलमधील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू केली आहे. आज हसन मुश्रीफ कागलमध्ये येणार हे माहीत असल्याने त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते त्यांच्या समस्या घेऊन निवासस्थानी जमा झाले होते. त्यांना ईडी कारवाई सुरु असल्याचे समजताच त्यांनी आपल्या भावना प्रकर्षाने व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ ईडीच्या रडारवर असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत.

#hasanmushrif #ncp #ed #kolhapur #bjp #opposition #narendramodi #bjpgovt #devendrafadnavis #cbi #maharashtra #hwnewsmarathi

Browse more videos

Browse more videos