Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/10/2023
घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे अशी टीका आता काँग्रेसने केली आहे. विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांचं नाव स्टेडियमलाही देण्यात आलं आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपाची वाटचाल ही राजेशाहीकडे चालली आहे असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे देश हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत असं विरोधक कायमच म्हणतात त्यानंतर आता सचिन सावंत यांनी भाजपावर देश राजेशाहीच्या दिशेने जात असल्याचाही आरोप केला आहे. घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांमध्ये चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम आलं. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. आधी इराक, उत्तर कोरिया, रशियासारख्या काही देशात हे दिसलं होतं आता लवकरच सर्वत्र भारतात दिसेल.

#sachinsawant #bjp #narendramodi #congress #china #xijinping #president #maharashtrabudget #ajitpawar #devendrafadnavis #maharashtra #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended